TRENDING:

मुंबईत रोहित पवार, नगरला लंके, नाशिकला भुसारा, कोणत्या महापालिकांची जबाबदारी कुणावर? राष्ट्रवादीकडून नेत्यांची नावे जाहीर

Last Updated:

राज्यातील आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी विभागनिहाय निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वाच्या नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जबाबदारी टाकण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठीचे पहिले पाऊल टाकले असून महत्त्वाच्या महापालिकांसाठी निवडणूक प्रभारीपदाच्या नेमणुका केल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने महापालिकांची जबाबदारी दिली आहे.
शरद पवार (अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस)
शरद पवार (अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस)
advertisement

शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने राज्यातील आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी नेत्यांची विभागनिहाय 'निवडणूक प्रभारी' म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितले. तत्पूर्वी स्थानिक युती आघाडीबाबतचा आढावा घेऊन नेमणूक केलेल्या निरीक्षकांनी पक्षाकडे अहवाल दिलेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेऊन युती आघाडीबाबतचे विश्लेषण निरीक्षकांनी केल्याची माहिती आहे.

बहुतांश प्रभारींकडे आपापल्या जिल्ह्यातील महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची चाचपणी करण्याची जबाबदारी असेल. जयंत पाटील यांच्याकडे गृहजिल्हा सांगलीत आघाडीची समीकरणे लक्षात घेऊन गणिते आखण्याची जबाबदारी असेल. नवी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे भाजपकडून महापालिका हिसकावून घेण्याची आणि त्यादृष्टीने आखणी करण्याची जबाबदारी असेल.

advertisement

कोणत्या नेत्यावर कोणत्या महापालिकेची जबाबदारी?

कोकण विभाग

बृहन्मुंबई- रोहितदादा पवार

ठाणे- डॉ. जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई- शशिकांत शिंदे

पनवेल- शशिकांत शिंदे

उल्हासनगर- जितेंद्र आव्हाड

कल्याण डोंबिवली- बाळ्यामामा म्हात्रे

भिवंडी निजामपूर- बाळ्यामामा म्हात्रे

मीरा भाईंदर- डॉ. जितेंद्र आव्हाड

वसई विरार-सुनिल भुसारा

नाशिक विभाग

नाशिक- सुनील भुसारा

अहिल्यानगर-निलेश लंके

advertisement

जळगाव-संतोष दौधरी

धुळे-प्राजक्त तनपुरे

मालेगाव- भास्कर भगरे

पुणे विभाग

पुणे- सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा

पिंपरी चिंचवड- डॉ. अमोल कोल्हे आणि रोहितदादा पवार

सोलापूर- धैर्यशील पाटील

कोल्हापूर- हर्षवर्धन पाटील

सांगली - मिरज-कुपवाड- जयंत पाटील

इचलकरंजी- बाळासाहेब पाटील

मराठवाडा-

छ. संभाजीनगर- बजरंग सोनवणे

नांदेड-वाघाळा-जयप्रकाश दांडेगावकर

परभणी- फौजिया खान

advertisement

जालना- राजेश टोपे

लातूर- विनायक पाटील

विदर्भ- अमरावती विभाग

अमरावती- रमेश बंग

अकोला- राजेंद्र शिंगणे

नागपूर विभाग

नागपूर- अनिल देशमुख

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी, मका आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

चंद्रपूर- अमर काळे

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत रोहित पवार, नगरला लंके, नाशिकला भुसारा, कोणत्या महापालिकांची जबाबदारी कुणावर? राष्ट्रवादीकडून नेत्यांची नावे जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल