TRENDING:

'तुतारीच्या उमेदवाराचे सूनेवर अत्याचार', रुपाली चाकणकरांचे फाईल दाखवत गंभीर आरोप

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारावर गंभीर आरोप केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
'तुतारीच्या उमेदवाराचे सूनेवर अत्याचार', रुपाली चाकणकरांचे फाईल दाखवत गंभीर आरोप
'तुतारीच्या उमेदवाराचे सूनेवर अत्याचार', रुपाली चाकणकरांचे फाईल दाखवत गंभीर आरोप
advertisement

पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार असल्यामुळे सगळ्याच नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापू पठारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बापू पठारे यांनी सूनेवर अत्याचार केल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांनी भर सभेत एफआयआरची कॉपी दाखवत, कुठे भेटायचं सांगा? असं आव्हानही पठारे यांना केलं आहे.

advertisement

बापू पठारे यांनी पुरावे घेऊन या म्हणून सांगितलं होतं. पुराव्याची फाईल दाखवली आणि एफआयआरही आहे. कुठे भेटायचं सांगा मी तयार आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

'यशोमती ठाकूर यांचा व्हिडिओ पाहिला, सुनिल वराडेनी 24 लाखांची खंडणी मागितली आहे. तुतारी गटाच्या नेत्याने खंडणी मागितली आहे. नगरमध्ये तुतारी गटाचे भानुदास मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत दानवे अश्लिल भाषेत बोलतात. सोशल मीडियाचा पदाधिकारी महिलांना अश्लिल व्हिडिओ पाठवतो', असे आरोप रुपाली चाकणकर यांनी केले आहेत.

advertisement

'सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजाराची किंतम काय कळणार? महिलांना याचा मोठा आधार आहे. इतिहासातली ही सगळ्यात मोठी योजना आहे. सरकार थेट महिलांच्या खात्यात हे पैसे देत आहे. दादांनी महाराष्ट्राला केलेला वादा पूर्ण केला. दीड महिना घसा ताणून टीका करत होते, मात्र आता तुम्हीही ही योजना आणली. 3 हजारांचे निकष काय आहेत?', असा सवाल रुपाली चाकणकर यांनी विरोधकांना विचारला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

बापूसाहेब पठारे हे पुण्याच्या वडगावशेरी मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विद्यमान सुनिल टिंगरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे वडगावशेरीमध्ये बापूसाहेब पठारे विरुद्ध सुनिल टिंगरे असा सामना रंगणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तुतारीच्या उमेदवाराचे सूनेवर अत्याचार', रुपाली चाकणकरांचे फाईल दाखवत गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल