TRENDING:

Satara: 1 वर्ष 27 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी, कराडच्या नीलम शिंदेंचं अमेरिकेत निधन, डोळ्यात पाणी आणणारा निर्णय

Last Updated:

नीलम शिंदे या अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या. कॅलिफोर्नियामध्ये रस्त्यावरून चालत असताना एका वाहनाने नीलमला मागून जोरात धडक दिली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

कराड: उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेलेल्या एका महाराष्ट्रीयन तरुणीच्या संघर्षाची डोळ्यात पाणी आणणारी घटना समोर आली आहे.महाराष्ट्रातील साताऱ्याच्या कराड तालुक्यात राहणाऱ्या नीलम तानाजी शिंदे या तरुणीची अखेर झुंज अपयशी ठरली आहे. अमेरिकेत एका अपघातात जखमी झालेल्या नीलम शिंदे यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. मागील 1 वर्ष 27 दिवसांपासून नीलम या कोमात होत्या.अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आखाती देशातील युद्धामुळे साताऱ्यातून त्यांच्या वडिलांना आपल्या लेकीच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही. त्यामुळे आपल्या लेकीला ते अखेरचा निरोपही देऊ शकले नाही.

advertisement

महाराष्ट्रातील साताऱ्याच्या कराड तालुक्यातील नीलम तानाजी शिंदे यांचा अमेरिकेत 14 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेतील Sacramento येथे सायंकाळी 7.30 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) दुर्दैवी अपघात झाला होता. त्या अपघातानंतर तिला तात्काळ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया हॉस्पिटल  येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेंव्हापासून त्या कोमामध्ये होती. डॉक्टरांनी नीलम शिंदे यांच्यावर शक्य ते सर्व उपचार केले, परंतु प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. जवळपास 13 महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे अखेर तिच्या शरीराने साथ दिली नाही आणि 28 मार्च 2026 रोजी उपचार सुरू असतानाच तिचे दु:खद निधन झालं.

advertisement

शिंदे कुटुंबीयांचा अवयव दानाचा निर्णय

तिच्या कुटुंबीयांनी अत्यंत उदात्त निर्णय घेत नीलम शिंदे यांच्या अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नीलम यांचे डोळे आणि त्वचा (स्कीन) दान करण्यात आली, ज्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे. नीलम शिंदे यांच्यावर  आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता अमेरिकन वेळेनुसार माऊंट व्हेरोन मेमरेबल पार्कमध्ये ( Mount Vernon Memorial Park) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

advertisement

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत

नीलम शिंदे या अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या. कॅलिफोर्नियामध्ये रस्त्यावरून चालत असताना एका वाहनाने नीलमला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात नीलमच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून कवटीचे फ्रॅक्चर, तसंच हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या अपघातात त्यांचा जीव वाचला पण तेव्हापासून त्या कोमात होत्या. या अपघाताची माहिती भारतात असलेल्या नीलमचे वडील तानाजी शिंदे, मामा संजय कदम यांना मिळाल्यानंतर व्हिसा मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याचा पाठपुरावा न्यूज 18 मराठीने केल्यानंतर अवघ्या काही तासात सरकारने दखल घेत यूएस वाणिज्य दूतावासाने व्हिसा तातडीने दिला होता.

advertisement

 वडील अंत्यसंस्काराला पोहोचू शकले नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video
सर्व पहा

मात्र, अखेर नीलम शिंदेंची मृत्यूशी सुरू असलेली झुंज 1 वर्ष 27 दिवसांनी अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत असताना आखाती देशातील युद्धामुळे वडील आणि कुटुंबियांचे उपस्थित राहू शकत नाहीत. तर अमेरिकेत स्थायिक असलेल्या निलमची आत्या यांनी सर्व विधी पार पाडला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: 1 वर्ष 27 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी, कराडच्या नीलम शिंदेंचं अमेरिकेत निधन, डोळ्यात पाणी आणणारा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल