सुधारित मोटार वाहन नियमांनुसार, एका वर्षात पाच किंवा त्याहून अधिक वाहतूक उल्लंघन करणाऱ्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकणार आहेत. हा बदल रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि जबाबदार वाहन चालवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा एक प्रयत्न केला जात आहे. 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, आरटीओ किंवा जिल्हा ट्रान्सपोर्ट ऑफिसने चालकाचा परवाना रद्द करण्यापूर्वी एकदा ड्रायव्हरची बाजू ऐकून घेतली पाहिजे. आरटीओने प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमाची जाहिरात बुधवारी (21 जानेवारी) काढण्यात आली आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर चालक परवाना रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावनी ही 1 जानेवारीपासून लागू झालीये.
advertisement
नव्या नियमानुसार, गेल्या वर्षी वाहतुकीसंबंधित मोडलेला नियम किंवा केलेला गुन्हा या वर्षी ग्राह्य धरला जाणार नाही. वाहतूक मंत्रालयाने सध्याच्या घडीला देशभरात 24 असे नियम केले आहेत, ज्यामुळे आरटीओ अधिकारी त्या नियम अखत्यारित तुमचे लायसन्स रद्द करू शकता. यामध्ये, वाहन चोरी, प्रवाशावर हल्ला, प्रवाशाचे अपहरण, वेगाची मर्यादा ओलांडलणे, मर्यादेपेक्षा जास्त सामान गाडीत भरणे, सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस स्थितीत सोडून जाणे यांसह इतर नियमांचा यामध्ये समावेश आहे. आरटीओने आखलेल्या नव्या नियमानुसार, पाच वाहतुकीसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये हेलमेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे यांसारख्या तुलनेने कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला. त्यामुळे हे साधे वाटणारे नियम जरी मोडले तरी तुमचा वाहन परवाना रद्द होऊ शकतो.
