आम्ही सगळे जण राजकीय पक्षाचे सदस्य आहोत, आमचे व्यवसाय असतात. राजकारण समाजकारण करून पक्षाचे काम करतो कारण आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते. देशासाठी, राज्यासाठी काम करायचे असतात. पण हे काम करत असताना पोटापाण्यासाठी उद्योग व्यवसाय करावे लागतात. व्यवसाय बाजूला ठेवू शकत नाही. केनवडेकरांचे बाजारपेठेत स्वत:चे दुकान आहे, त्यांचे व्यवसाय आहेत. व्यवसायाचे पैसे असतील तर त्यात चुकीचे काय आहे? असे नितेश राणे म्हणाले.
advertisement
मिळालेल्या पैशाचे काय? काय कारवाई करणार? नितेश राणे म्हणाले...
पैसे मिळून आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली गेली आहे. पोलीस चौकशी करतायेत, आम्ही हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. केनवडेकर यांच्याकडून अशी कृती होत नाही. भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढविण्याची काही गरज नाही, मोदी फडणवीस यांचे नेतृत्व असताना आम्हाला असे करण्याची गरजच काय? आम्ही विकासावर बोलतोय, त्यावरच मते मागतोय. निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशीत उलगडा होईल, असे नितेश राणे म्हणाले.
आम्हाला वेगळे पैसे द्यायची गरजच पडत नाही
मतदारांना वाटण्यासाठीच पैसे आणले होते, या नीलेश राणे यांच्या आरोपावर बोलताना नितेश राणे म्हणाले, विजय केनवडीकर यांचे व्यवसाय आहेत. त्यांची प्रोफाईल पाहिली तरी सगळ्यांना उत्तरे मिळतील. हमाम मे सब नंगे होते हैं... चौकशी पारदर्शक होईल. मसल पॉवर वगैरेची आम्हाला काही गरज नाही. लाडकी बहीण, शेतकरी सन्मान या योजनांचे लाभार्थी भरपूर आहेत. त्यांना दुसरं काही द्यायचीच गरज नाही, असा टोला त्यांनी बंधू नीलेश राणे यांना लगावला. कुणी कितीही प्रयत्न केले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवडणूक विकासावरच लढणार. निवडणूक कुणालाही भरकटवायला देणार नाही, असेही ते म्हणाले.
राणे बंधूंमध्ये संघर्ष आहे का? नितेश राणे म्हणाले...
प्रदेशाध्यक्ष चव्हाण जिल्ह्यात आले आणि पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला, या नीलेश राणे यांच्या आरोपावर नितेश म्हणाले, तो राजकीय आरोप आहे. उदय सामंतही जिल्ह्यात आले होते मग आम्ही विचारू का, नुसतेच आले की सांताक्लॉज बनून आले होते? नेते येतात, त्यांच्या येण्याच्यावर आक्षेप घ्यायका का? आधीही महायुती म्हणूनच काम केले ना... नेते म्हणून ते शिवसेनेची आणि मी भाजपची बाजू मांडतोय. प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडतंय, कम्युनिकेशन करण्यासाठी निवडणूक नाही, असे म्हणत दोघांमधल्या संघर्षावर त्यांनी भाष्य केले.
