मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे छगन भुजबळ चांगलेच नाराज झाले आणि त्यांनी थेट अजित पवारांवरच टीका केली. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राज्यातल्या ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या. यानंतर आज मुंबईमध्ये ओबीसी संघटनांच्या नेत्यांची 5 तास बैठक चालली.
बैठकीत काय झालं?
या बैठकीत आरक्षण मागणी, ओबीसी राजकीय संघटनेची ताकद वाढवणं, गेल्या विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या जागा आणि झालेलं मतदान, याबरोबरच ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याबद्दल चर्चा झाली. या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत.
advertisement
ओबीसी बहुजन आघाडीच्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर पाठिंबा दर्शवला आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ओबीसी नेत्यांची ही पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपावेळी छगन भुजबळ आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या.