विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रामध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केली असल्याचा आरोप करुणा शर्मा मुंडे यांनी केला होता. या आरोपांच्या आधारे लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी परळी वैद्यनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
advertisement
या प्रकरणाची आज अंतिम सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाने करुणा शर्मा मुंडे यांनी नोंदवलेला जबाब, त्यांच्या वकिलांनी मांडलेले युक्तिवाद तसेच प्रकरणातील वस्तुस्थिती आणि उपलब्ध कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप सिद्ध होण्याजोगे नाहीत आणि त्यामध्ये कोणतेही ठोस तथ्य आढळून येत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावण्यात येत असल्याचा आदेश कोर्टाने दिला.
कृषी घोटाळ्याप्रकरणाची देखील याचिका फेटळणार
दरम्यान, याआधीही मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली कथित कृषी घोटाळ्याप्रकरणीची याचिका फेटाळून लावली होती. त्या प्रकरणातही कोर्टाला कोणतेही ठोस पुरावे किंवा तथ्य आढळले नव्हते. त्या प्रकरणातही कोर्टाला कोणतेही तथ्य आढळले नव्हते
नेमके काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात आपल्या 5 अपत्यांचा उल्लेख केला होता. यात त्यांनी शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे या दोन अपत्यांचा प्रथमच उल्लेख केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दिले होते, त्यात या दोन अपत्यांचा उल्लेख नव्हता. यावर करुणा मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. विशेषतः धनंजय मुंडे यांनी यावेळी या अपत्यांचा उल्लेख का केला? याचे कारणही शपथपत्रात नमूद केले होते. त्यांच्या मते, तेव्हा ते त्यांच्यावर अवलंबून नव्हते. शपथपत्रामध्ये शपथ पत्र देणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचाच उल्लेख केला जातो. म्हणून आता शिवानी मुंडे आणि सिशिव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.
हे ही वाचा :
