TRENDING:

परभणीत शिवसेनेचा मुस्लिम महापौर बसला! सय्यद इकबाल खाजा नवे महापौर, निवडीची Inside Story

Last Updated:

Parbhani Mayor Election: परभणी महापालिकेच्या महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक संपन्न झाली. शिवसेनेचे नगरसेवक सय्यद इकबाल खाजा यांची महापौर म्हणून निवड झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परभणी: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परभणी महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्यद इकबाल खाजा विराजमान झाले. परभणीत मुस्लिम नगरसेवकांची अधिक संख्या लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मराठीचा मुद्दा लावून धरल्यानंतर परभणीत मुस्लिम महापौर देण्याचा मार्ग शिवसेनेने अवलंबला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे याआधी १९९५ च्या युती सरकारच्या काळात दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी साबिर भाई शेख यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती.
संजय जाधव-सय्यद इक्बाल खाजा
संजय जाधव-सय्यद इक्बाल खाजा
advertisement

परभणी महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले. शिवसेना-काँग्रेसकडे बहुमत असल्याने दोन्ही पक्षांच्या आघाडीने सत्ता स्थापन केली. त्या अनुषंगाने परभणीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांच्या मतानुसार महापौर म्हणून सय्यद इकबाल खाजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापौर म्हणून शिवसेना मुस्लिम चेहरा देणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. सय्यद इक्बाल खाजा यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.

advertisement

...म्हणून शिवसेनेने मुस्लिम महापौर केला

परभणी महापालिका निवडणुकीत एकूण ३० मुस्लिम निवडून आले आहेत. ठाकरेंच्या २५ नगरसेवकांपैकी १३ मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. तर उर्वरित १२ हिंदू सदस्य आहेत. मुस्लिम नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने अल्पसंख्याक समुदायाला महापौर करण्याचे पक्षाचे ठरले असल्याचे कळते.

अपक्ष आणि दादांच्या नगरसेवकाचीही सेना-काँग्रेसला साथ

सत्तास्थापनेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू होती. बरेच प्रयत्न करूनही संख्याबळ जुळत नसल्याने भाजपने सत्तास्थापनेच्या स्पर्धेतून माघार घेतली. परभणी महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ३४ नगरसेवकांची गरज होती. काँग्रेस आणि शिवसेनेकडे एकूण ३७ नगरसेवकांचे पाठबळ होते. तसेच एक अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याने देखील सेना-काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान केले.

advertisement

परभणी महापौरपदाच्या निवडीनंतर खासदार बंडू जाधव काय म्हणाले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

परभणीकरांनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थकी करून दाखवू. चंद्रपूरची घटना ताजी होती. त्यामुळे आमच्यात सामंजस्याने गोष्टी होणे महत्त्वाचे होते. काँग्रेस आणि आम्ही एकमताने महापौर-उपमहापौरपदाचा निर्णय घेतला, असे खासदार बंडू जाधव यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परभणीत शिवसेनेचा मुस्लिम महापौर बसला! सय्यद इकबाल खाजा नवे महापौर, निवडीची Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल