TRENDING:

PCMC Elections : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेनेला 440 व्होल्टचा झटका, 5 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द

Last Updated:

बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्याचा फटका भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेनेला 440 व्होल्टचा झटका, 5 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेनेला 440 व्होल्टचा झटका, 5 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द
advertisement

पिंपरी-चिंचवड : बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्याचा फटका भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये बसला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या 5 उमेदवारांनी वेळेमध्ये एबी फॉर्म सादर न केल्यामुळे त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे, यामध्ये भाजपचे 3 तर शिवसेनेच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे. हे कमी म्हणून की काय भाजपच्या चौथ्या उमेदवाराचा अर्जही बाद होण्याची शक्यता आहे.

advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेनेला धक्का

दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप आणि शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजपचे तीन आणि शिंदेंचे दोन एबी फॉर्म बाद झाले आहेत, त्यामुळे आता या पाचही जणांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरवण्यात आले.

अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे पाच एबी फॉर्म जमा झाले होते, त्यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे आजच्या छाननीमध्ये एबी फॉर्म बाद ठरवले गेले. आता या पाचही उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे. या गोंधळामुळे आता प्रभाग क्रमांक 24 मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकच उमेदवार असेल तर शिवसेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढतील.

advertisement

कुणाचे एबी फॉर्म बाद?

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या करिश्मा बारणे, शालनी गुजर, गणेश गुजर तर शिवेसनेच्या निशा प्रभू आणि रुपाली गुजर यांचे एबी फॉर्म बाद झाले आहेत, त्यामुळे हे पाचही उमेदवार आता अपक्ष म्हणून निवडणूक लढतील.

भाजपच्या चौथ्या उमेदवारावरही संकट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली,सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई
सर्व पहा

दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधल्या भाजपच्या आणखी एका उमेदवारावर अर्ज बाद व्हायचं संकट ओढावलं आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपकडून गणेश ढाकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण गणेश ढाकणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ढाकणे यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत. ढाकणे यांच्याकडे विधानसभा मतदारसंघ 222 शेवगाव आणि विधानसभा मतदारसंघ 206 पिंपी, अशी दोन मतदार ओळखपत्रे आहेत. याशिवाय ढाकणे हसनापूर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PCMC Elections : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेनेला 440 व्होल्टचा झटका, 5 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल