या प्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी प्रशांत बनकरला एका फार्महाऊसवर अटक केली. तर शनिवारी रात्री उशिरा गोपाल बदणेनं पोलीस ठाण्यात स्वत:हून सरेंडर केलं. खरंतर, डॉक्टर महिलेच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर बदणे फरार झाला होता. तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. मात्र शनिवारी रात्री उशिरा त्याने अचानक पोलिसांकडे सरेंडर केलं.
advertisement
सरेंडर करण्यामागचं कारण काय?
आता अशाप्रकारे सरेंडर करण्यामागचं कारण समोर आलं आहे. खरं तर, महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी कळाल्यानंतर बदणे फरार झाला होता. दोन दिवसांत त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला होता. पीएसआय बदणे दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूर गेला होता. त्यानंतर तो बीडला आपल्या घरीही जाऊन आला. तो सोशल मीडियावरून सोलापूरच्या काही पोलिसांच्या संपर्कात देखील होता.
दरम्यान, पोलिसांनी बदणे याच्या कुटुंबायांना त्याला हजर व्हायला सांगा, तो हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ केलं जाईल, अशी कल्पना दिली. ही कल्पना दिल्यानंतर पीएसआय बदणे या घटनेची माहिती एका स्थानिक पत्रकाराला कळवली आणि तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान आपण कुठलाही बलात्कार केला नाही, असा दावाही बदणेनं केला. मात्र संबंधित डॅाक्टर महिलेबरोबर काय संबंध होते? हे तो सांगत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे. आज रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने त्याला सुट्टीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
