TRENDING:

डॉक्टर महिलेला छळणारा PSI बदने कुठे पळाला? अखेर लोकेशन सापडलं, पोलीस पथकं रवाना

Last Updated:

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी आज सकाळी पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्याप फरार असून आता पोलिसांना त्याचं लोकेशन सापडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वीरेंद्रसिंह उत्पाट, प्रतिनिधी पंढरपूर: सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. तिने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला आहे. आपल्या मृत्यूस पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर नावाची व्यक्ती असल्याचा उल्लेख त्यांनी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये केला आहे.
News18
News18
advertisement

पीएसआय बदाने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं तिने हातावर लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर दोघंही फरार झाले. आज पहाटे पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. पुण्यातील एका फार्महाऊसमधून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांतला अटक केली असली तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्याप फरार आहे.

advertisement

फरार पीएसआय गोपाळ बदनेचं लोकेशन कुठे आढळलं?

मात्र पोलिसांना आता त्याचं लोकेशन सापडलं आहे. निलंबित पीएसआय गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात आढळलं आहे. डॉक्टर महिलेच्या आत्महत्येची बातमी समोर येताच बदने फरार झाला होता. तो कुठे गेला? याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. सातारा पोलिसांची चार ते पाच पथकं त्याचा शोध घेत होती. मात्र अखेर काल रात्री गोपाल बदनेचं लोकेशन पंढरपुरात आढळलं आहे.

advertisement

तो पंढरपुरात कुठेतरी लपून बसला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे. आरोपी बदने याने आपल्यावर चारवेळा लैंगिक अत्याचार केला, असा आरोप मयत डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये केला आहे. पोलीस प्रशासनातील एका व्यक्तीने अशाप्रकारे महिलेचा छळ केल्याने गृहविभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

advertisement

प्रशांत बनकर कुठे सापडला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दगडूशेठ गणपती मंदिरात उमांगमलज जन्मोत्सव, बाप्पाला 1100 नारळांचा महानैवद्य
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यापासून प्रशांत बनकर फरार झाला होता. तो थेट पुण्यात आला. इथं तो एका मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता. मागील काही तासांपासून तो इथेच मुक्कामी होता. मात्र पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे चार वाजता संबंधित फार्महाऊसवर छापेमारी केली. यावेळी तिथे प्रशांत बनकर पोलिसांना आढळला. ग्रामीण पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येतायत का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टर महिलेला छळणारा PSI बदने कुठे पळाला? अखेर लोकेशन सापडलं, पोलीस पथकं रवाना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल