या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. दोघांच्या अटकेनंतर आता महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आतापर्यंत सगळ्यात मोठा पुरावा हाती लागला आहे. खरं तर, ज्यावेळी हे प्रकरण समोर आलं, तेव्हा प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, पीएसआय गोपाल बदणेला आपण ओळखत नाही. पण आता प्रशांत बनकर आणि गोपाल बदाणे यांचं कनेक्शन समोर आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांच्यात बराचवेळ फोनवरून चर्चा झाली. ही चर्चा सामान्य फोन कॉलवरून झाली नाही, तर व्हॉट्सअॅप कॉलवरून झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या दोघांत याच घटनेशी संबंधित मुद्यांवरच चर्चा झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आता या दोघांकडून माहिती उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. तूर्त, पीएसआय बदणे हा महिला डॉक्टरसोबत आपले कोणत्या पद्धतीचे संबंध होते? हे सांगणं टाळत आहे.
कारण आरोपी स्वतः पोलीस उपनिरीक्षक आहे, तसेच त्याला या प्रकरणाची चौकशी कशी होणार? कोर्टात काय आणि कसा युक्तिवाद होणार? आदी गोष्टींची पुरेपुर कल्पना आहे. त्यामुळे पोलिसांपुढे त्याच्या तोंडून सत्य वदवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. याशिवाय पोलीस महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्यांचेच आहे का? हे ही तपासून पाहत आहेत. तूर्तास या प्रकरणात बदणे आणि बनकर यांच्यातील कनेक्शन उघड करणारा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.
