बदणे याने आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असं तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली. त्यानेतर निलंबित पीएसआय गोपाल बदणे स्वत:हून काल रात्री फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने ग्रामीण पोलिसांकडे सरेंडर केल्यानंतर आता बदणे याला ग्रामीण पोलीसच मदत करत होते, असा आरोप केला जात आहे.
advertisement
विशेष म्हणजे ज्या दिवशी डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली होती. त्या रात्री गोपाल बदणे हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याची रात्री गस्ती घालण्याची ड्युटी होती. पण डॉक्टर महिलेचं प्रकरण अंगाशी येणार असल्याचं लक्षात आल्यानंतर बदणे फरार झाला, अशी माहिती समोर येत आहे. मागील ३६ तासांपासून बदणे फरार होता. आता अखेर त्याने सरेंडर केलं आहे.
विशेष म्हणजे तो ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याच पोलीस ठाण्यात त्याने सरेंडर केलं आहे, त्यामुळे फलटण ग्रामीण पोलीसच त्याला मदत करत होते, असा आरोप केला जात आहे. बदणे याचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात आढळलं होतं. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याला पकडण्यासाठी सातारा पोलीस पंढरपुरला रवाना झाले होते. त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. अशात त्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना, आपण कार्यरत असलेल्या ग्रामीण पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर केलं आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामीण पोलीस त्याला मदत करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बदाणेच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
