TRENDING:

आमच्या वॉर्डात आमदार बनसोडेंचा पोरगा नको, महिला आक्रमक, अजितदादांवर प्रश्नांच्या फैरी

Last Updated:

पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे मंगळवारी पिंपरी चिंचवडमधील सामान्य महिलांनी पालिका निवडणुकीतील घराणेशाहीतील संभाव्य उमेदवारीविरोधात संताप व्यक्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झालेली असली तरी युती आघाड्यांच्या चर्चांनी अद्याप अंतिम वळण घेतलेले नाही. तसेच काही जागांवरील उमेदवारांच्या नावांवरही अद्याप एकमत न झाल्याने मुलाखतींसाठी बैठका संपन्न होत आहे. नेहमीप्रमाणे उमेदवारीसाठी घराणेशाहीतून लॉबिंग सुरू असल्याने इच्छुकांच्या उमेदवारीचे काय होणार? असा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील एका प्रभागातील महिलांनी आपल्या इच्छुक नेत्याच्या समर्थनार्थ घोषणा देऊन आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा उमेदवार म्हणून आम्हाला चालणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले.
अजित पवार
अजित पवार
advertisement

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर इतर पक्षांसोबत युती आघाडीची चाचपणी अजित पवार करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून पुण्यात विविध पक्षांसोबत-नेत्यांसोबत बैठका संपन्न होत आहेत. यादरम्यान विविध इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतही पार पडत आहेत. मंगळवारी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पिंपरी चिंचवडमधील सामान्य महिलांनी पालिका निवडणुकीतील घराणेशाहीतील संभाव्य उमेदवाराविरोधात संताप व्यक्त केला.

advertisement

अण्णा बनसोडे यांचा मुलगा उमेदवार म्हणून आम्हाला चालणार नाही

पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सुपु्त्र लढण्यासाठी इच्छुक आहेत. प्रभागात बनसोडे यांच्याकडून तशी तयारी देखील सुरू आहेत. मात्र बनसोडे यांच्या उमेदवारीवर स्थानिकांचा तीव्र आक्षेप आहे. अण्णा बनसोडे यांचा मुलगा उमेदवार म्हणून अजिबात चालणार नाही. आमच्या कष्टकरी लोकांमधूनच आम्हाला उमेदवार हवाय, असे महिलांनी मागणी केली. बारामती हॉस्टेल येथे येऊन महिलांनी आक्रमक पद्धतीने मागणी केली.

advertisement

लाडकी बहीण म्हणता मग त्यांच्या मताला किंमत का देत नाही?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश
सर्व पहा

अजित दादा पवार आम्हाला भेटत नाहीत, विधानसभेवेळीही आम्हाला आश्वासन दिले होते. पण आम्हाला दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. आम्हाला बनसोडे यांचा सुपुत्र उमेदवार म्हणून नकोय. आम्ही सगळ्या कष्टकरी स्त्रिया आहोत. आमच्या मधलाच कुणीतरी उमेदवार म्हणून हवाय. बाबा कांबळे आमच्यासाठी काम करतात. त्यांना पक्षाने उमेदवारी द्यायला हवी. आम्हाला आता चॉकलेट नकोय, असे म्हणत प्रभागातील स्त्रिया आक्रमक झाल्या होत्या. तसेच लाडकी बहीण म्हणता मग त्यांचे ऐकत का नाही? त्यांच्या मताला किंमत का देत नाही? अशा प्रश्नांच्या फैरीही त्यांनी झाडल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आमच्या वॉर्डात आमदार बनसोडेंचा पोरगा नको, महिला आक्रमक, अजितदादांवर प्रश्नांच्या फैरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल