वय फक्त आकडा, 62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात राहणारे 62 वर्षीय अनिल खेडकर यांनी नुकताच आकुर्डी ते तिरुपती असा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात राहणारे 62 वर्षीय अनिल खेडकर यांनी नुकताच आकुर्डी ते तिरुपती असा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. तब्बल 1,136 किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी सायकल चालवा आणि तंदुरुस्त राहा असा संदेश तरुणांना दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनिल खेडकर सायकल प्रवासाच्या माध्यमातून विविध ठिकाणी भेटी देत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी सायकल प्रवासाबाबत त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
अनिल खेडकर हे चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य आहेत. त्यांनी सुमारे 10 वर्षे प्राचार्य म्हणून काम केले असून, क्रीडा शिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शरीर तंदुरुस्त राहावे, यासाठी त्यांनी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातूनच पुढे त्यांचा सायकल प्रवास सुरू झाला.
advertisement
खेडकर यांनी आकुर्डी ते हरिद्वार असा 1,722 किलोमीटर, तर आकुर्डी ते गंगासागर असा 1,857 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे. याशिवाय अष्टविनायक, शनिशिंगणापूर, पंढरपूर आणि उज्जैन येथेही त्यांनी सायकलने प्रवास केला आहे. आतापर्यंत त्यांनी 539 दिवसांत एकूण 35,642 किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे.
2024 साली जानेवारी महिन्यात त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्याचबरोबर आकुर्डी ते शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, मुंबई, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा पायी प्रवासही त्यांनी पूर्ण केला आहे. सायकल प्रवास करत असताना त्यांनी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश अशा एकूण बारा राज्यांतून प्रवास केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 4:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
वय फक्त आकडा, 62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश









