Virat Kohli : विराटचं कमबॅक, पण चाहत्यांना धक्का... कोहलीच्या सामन्यात प्रेक्षकांना 'नो एन्ट्री', कारण काय?

Last Updated:

जवळपास 15 वर्षांनंतर विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमबॅक करत आहे, पण चाहत्यांना विराटची बॅटिंग बघता येणार नाही.

News18
News18
बंगळुरू : बंगळुरूच्या क्रिकेट चाहत्यांना विराट कोहलीची बॅटिंग बघण्याची संधी मिळणार नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यातल्या चिन्नास्वामी स्टेडियममधल्या सामन्याला बंगळुरू शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली दिल्लीकडून आंध्र प्रदेश आणि गुजरातविरुद्ध अशा दोन मॅच खेळणार आहे. शहराबाहेरील अलूर मैदानावर गर्दीची समस्या उद्भवू लागल्यामुळे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने अलूर स्टेडियमवर होणारे सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हलवण्याचा निर्णय घेतला, पण चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने खेळवायला बंगळुरू पोलिसांनी परवानगी दिली नाही.
चिन्नास्वामी स्टेडियमवरही मॅच खेळायला परवानगी न मिळाल्यामुळे आता कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे हे दोन्ही सामने होणार आहेत. सीओई परिसरामध्ये एकूण 3 मैदाने आहेत.
सोमवारी बंगळुरू शहर पोलीस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने चिन्नास्वामी स्टेडियमची पाहणी केली आणि पॅनेलचे प्रमुख असलेले ग्रेटर बंगळुरू प्राधिकरण (जीबीए) आयुक्त महेश्वर राव यांना आपला अहवाल सादर केला. 'समितीने स्टेडियमची पाहणी केली आणि असा निष्कर्ष काढला की सामने आयोजित करण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. आवश्यक काम पूर्ण झाल्यानंतरच सामने आयोजित करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने आयोजित करण्याची केएससीएची परवानगी नाकारण्यात आली आहे', असं शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग म्हणाले.
advertisement
बैठकीदरम्यान, केएससीए अधिकारी आणि पॅनेलने न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा कमिशनच्या अहवालाच्या अंमलबजावणीवरही चर्चा केली, ज्यामध्ये 17 शिफारशींचा उल्लेख करण्यात आला होता. 24 डिसेंबरच्या सामन्यापूर्वीच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं, शहर पोलिसांना सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ख्रिसमस उत्सव व्यवस्थापित करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली.
सेंटर ऑफ एक्सलन्स येथे अनुक्रमे ग्राउंड दोन आणि एकवर सामने आयोजित केले जातील. 4 जूनला आरसीबीच्या विजयी सोहळ्यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, यात 11 जणांचा मृत्यू झाला तर बरेच जण जखमी झाले, त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव चिन्नास्वामी स्टेडियमवरचे पुढचे सगळे सामने स्थगित करण्यात आले. विजय हजारे ट्रॉफीनिमित्त विराट बंगळुरूमध्ये खेळणार आहे, त्यामुळे केएससीएने चिन्नास्वामी स्टेडिमवर सामने खेळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला परवानगी मिळाली नाही.
advertisement

प्रेक्षकांशिवाय सामना

सीओईमध्ये प्रेक्षकांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे विराट कोहली जे दोन सामने खेळणार आहे, ते बंद दाराआड खेळवले जातील. विराटची बॅटिंग बघता येणार नसल्यामुळे चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी मंगळवारी दिल्लीसाठी नेट प्रॅक्टिस केली. दोघांनीही त्यांचे दिल्लीच्या टीममधील सहकारी इशांत शर्मा आणि नवदीप सैनी यांच्यासोबत एक तास सराव केला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : विराटचं कमबॅक, पण चाहत्यांना धक्का... कोहलीच्या सामन्यात प्रेक्षकांना 'नो एन्ट्री', कारण काय?
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement