Fridge : फ्रिज नसेल तरी भाजी ताजी कशी ठेवायची? आजीबाईंच्या 'या' ट्रिक्स आजही मॉर्डन सुनांसाठी कामाच्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Indian kitchen hacks for fresh veggies : पालेभाज्या तर आणल्या-आणल्याच कोलमडायला लागतात. मेथी असो वा कोथिंबीर, ती कोमेजलेली दिसली की आपल्यालाही वाईट वाटतं,
स्वयंपाक घरात फ्रीज ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भाज्या ताज्या ठेवण्यासाठी आणि जेवण चांगलं ठेवण्यासाठी फ्रीज गृहिणींसाठी वरदानच आहे. यामध्ये दुध देखील खराब होत नाही फळ तसेच इतर पदार्थ ताजे राहातात. त्यामुळे गृहिणी स्वतः बाजारातून पिशवी भरून ताज्या, टवटवीत भाज्या आणतात. पण खरं टेन्शन तेव्हा येतं, जेव्हा आपल्याला कळतं की फ्रिजमध्ये आधीच डबे भरलेत किंवा ऐनवेळी फ्रिजने दगा दिलाय आणि त्याने भाज्या ताज्या ठेवणं बंद केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
1. पालेभाज्यांसाठी पाणी संजीवनीमेथी, पालक किंवा कोथिंबीर आणली की आपण ती तशीच प्लास्टिकमध्ये ठेवतो, हीच मोठी चूक, मग काय कराल? एका भांड्यात थोडं पाणी घ्या आणि कोथिंबीर किंवा मेथीची जुडी (मुळं खाली राहतील अशा पद्धतीने) त्यात उभी करून ठेवा. जसं आपण फुलदाणीत फुलं ठेवतो ना, अगदी तसंच. फक्त लक्षात ठेवा, पानं पाण्यात बुडणार नाहीत, नाहीतर ती कुजतील. यामुळे दोन दिवस तरी भाजी अगदी टवटवीत राहते.
advertisement
2. मातीचं माठ किंवा डेरा वापराउन्हाळ्यात आपण पाणी थंड करण्यासाठी माठ वापरतो, पण तो भाज्यांसाठीही बेस्ट आहे.काय कराल? एक मोठं मातीचं भांडं (ज्याला छिद्र नसतील) घ्या, त्यात थोडी ओली वाळू किंवा ओला सुती कपडा खाली अंथरा आणि त्यावर भाज्या ठेवा. वरून पुन्हा ओल्या कपड्याने झाकून ठेवा. मातीच्या थंडाव्यामुळे भाज्या 4-5 दिवस अजिबात खराब होत नाहीत.
advertisement
3. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवताय? तर सावधानआपल्यापैकी अनेकजणी एकाच टोपलीत कांदे आणि बटाटे साठवतात. पण कांद्यातून बाहेर पडणाऱ्या एका विशिष्ट गॅसमुळे बटाटे लवकर सडतात किंवा त्यांना मोड येतात.काय कराल? कांदे आणि बटाटे नेहमी वेगवेगळ्या टोपलीत ठेवा. बटाट्यांच्या टोपलीत एखादं 'सफरचंद' ठेवलं, तर बटाटे जास्त काळ टिकतात, ही एक जुनी गुपित ट्रिक आहे.
advertisement
advertisement
advertisement








