समोर आलेल्या माहितीनुसार हरिराम मारोती गिते (वय34) आणि प्रवीण रानडे (वय 32)अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. ते वसई वाहतूक पोलीस शाखेत शिपाई पदावर कर्यरत आहेत. हे दोन्ही पोलीस कर्मचारी आपले मित्र माधव केंद्रे (वय 32) शंकर गिते (वय 32) आणि सतवा केंद्रे (वय 32) यांच्यासोबत रजा घेऊन सहलीसाठी गोव्याला निघाले होते. याचदरम्यान देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणार एक 18 वर्षांची महाविद्यालयीन तरुणी तिच्या घराकडे एकटी जात होती. ती एकटी असल्याचं पाहून पोलिसांनी तिचा विनयभंग केला. या मुलीनं झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं मात्र आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर या मुलीचा हात धरून तिला वाहनात खेचत पळून नेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मात्र ही घटना तेथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानं ग्रामस्थ गोळा झाले. स्थानिकांनी आरोपींना बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
