TRENDING:

jitendra awhad: जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

Last Updated:

मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(जितेंद्र आव्हाड)
(जितेंद्र आव्हाड)
advertisement

महाड : नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. एवढंच नाहीतर ॲट्रॉसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे.

शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधली श्लोकांचा समावेश करण्याचा विचार केला जात आहे. त्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन पुकारले होते. आज महाडमध्ये त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. पण यावेळी आव्हाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले. त्यामुळे महाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी बजावलेले नोटीसीचं उल्लंघन करून नियमबाह्य जमाव जमावल्या बाबतगुन्हा दाखल झाला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या प्रती फाडल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर आंदोलकांवरही गुन्हे दाखल झाले आहे.

advertisement

काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा, अशी शिफारस केली आहे. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीची श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेडकडून मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्यास विरोध केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता. तर अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.

advertisement

जितेंद्र आव्हाड यांची जाहीर माफी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एस्थेटिक सिरेमिक कप, 250 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे सर्वात स्वस्त मार्केट
सर्व पहा

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या निषेधार्थ आम्ही महाड येथे आंदोलन करत होतो. यावेळी अनावधानाने माझ्याकडून आणि कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेलं पोस्टर फाडलं गेलं. ही आमची अक्षम्य चूक आहे. याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची माफी मागतोय. हे प्रकरण माझ्या हृदयाला खूप लागलं आहे. कृपया महाराष्ट्रातील जनतेने मला माफ करावं, अशी जाहीर माफी जितेंद्र आव्हाड यांनी मागतली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
jitendra awhad: जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल