संघटनात्मक बांधणी, प्रभागनिहाय आढावा, कार्यकर्ता प्रशिक्षण आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अकोल्यातील यशवंत भवन येथे आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काँग्रेसकडून राजकीयदृष्ट्या दिशाभूल सुरू
काँग्रेसकडून युतीच्या बाबतीत स्पष्टता नसल्याची टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काँग्रेसकडून युतीसाठी तोंडी तयारी दर्शवली जाते; मात्र अधिकृत घोषणा करण्याची वेळ आली की ‘थांबूया’ असे सांगितले जाते, ही भूमिका राजकीयदृष्ट्या दिशाभूल करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसचे नेते वारंवार युतीसाठी सकारात्मक संकेत देतात. परंतु प्रत्यक्षात निर्णय जाहीर करण्यास टाळाटाळ केली जाते. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी स्पष्ट भूमिका आवश्यक असते. मात्र काँग्रेसची भूमिका सातत्याने बदलत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे, असा आरोप त्यांनी केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावणार आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून आहे.
