'जरांगे-फडणवीसांचं भांडण खरं की खोटं?'
ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान पंढरपुरात प्रकाश आंबेडकरांनी मराठा-ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. "जरांगे पाटील आणि फडणवीस यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ओबीसी कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीत. राजकारण समजून घ्या, जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस याचे भांडण नकली आहे. भाजपाने ओबीसी विरोधात भूमिका घेतली आणि जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला. तरच हे भांडण आहे. हे समजून घेऊ, अन्यथा हे नकली भांडण आहे" अशी भूमिका यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मांडली.
advertisement
शरद पवार पळवाटेने पळाले -आंबेडकर
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आणि ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ व लक्ष्मण हाके यांना एकत्र बसवून प्रश्न सोडवावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. यावरून प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीकेची तोफ डागली " शरद पवारांची ही पळवाट आहे. ते गेले अनेक वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिलेले मराठा नेते आहेत. त्यांनी तर खरा हा प्रश्न मागेच सोडवायला पाहिजे होता. परंतु ते आता या प्रश्नावरून पळवाट काढत आहेत." असं आंबेडकर म्हणाले.
'पक्षात येण्यासाठी काही जणांची इच्छा', शरद पवारांनी टाकला बॉम्ब, दादांची साथ कोण सोडणार?
आता प्रकाश आंबेडकरांच्या विधानातून निष्कर्ष काढणं तितकं सहज नसलं तरी, राज्यात पेटलेला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार शरद पवारांनी केलेलं आवाहन मनावर घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामध्ये मनोज जरांगे नेमकी काय भूमिका यावर देखील बऱ्याचश्या गोष्टी अवलंबून असणार आहेत.
