राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सतत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही वैयक्तिक टीका केली. महाकुंभवर बोलताना राज ठाकरे यांनी तिकडचे पाणी मी पिणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य नितेश राणे यांना खटकले होते. तेव्हा सायंकाळी साडे सातनंतरचं पाणी बरं चालतं..! तेव्हा तुमच्या अंगाला खाज सुटत नाही का? अशी वैयक्तिक टीका नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती. याच टीकेला प्रकाश महाजन यांनी उत्तर दिले.
advertisement
राणेंनी पोराच्या मुस्काटात द्यायला पाहिजे होती
मी काही बोलल्यावर राज ठाकरे आमचे मित्र आहेत, असे राणे सांगतात. मग त्यांच्याविषयी वैयक्तिक टीका करताना नितेशला काहीच वाटत नाही? नारायण राणे यांनी नितेशच्या दोन थोबाडीत मारायला पाहिजे होत्या. राज ठाकरे तुमचा मित्र असेल तर माझा नेता आहे. माझ्या नेत्याविषयी काहीही बोललेलं कसं खपवून घेईल? असा सवाल महाजन यांनी केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नितेश राणे एकेरी भाषेत बोलतो. अरे उद्धव वगैरे म्हणतो. ते काय नितेशच्या वयाचे आहेत का? बोलताना भान ठेवता येत नाही का? असेही महाजन म्हणाले.
राणे आणि महाजन यांच्यात वाद का?
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांना जीभ आवरण्याचा सल्ला देताना त्यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. नितेश राणे यांच्या उंचीवरून बोलताना चोकदार शब्दात सुनावले होते.
प्रकाश महाजन यांची टीका झोंबल्याने जेष्ठ नेते नारायण राणे दुखावले. त्यांनी फेसबुक पोस्ट करून महाजन यांची लायकी काढली आहे.
निलेश, नितेश आणि नारायण राणे हे दूरच पण आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही नक्की कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरवली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात? असा प्रश्न नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना विचारला.