TRENDING:

'तो' सोनार नावाचा माणूस कोण? प्रांजल खेवलकर प्रकरणाला नवीन वळण, जळगाव पोलीसही शॉक!

Last Updated:

प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळून आले आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव: पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. आता मात्र  डॉक्टर प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये जळगावच्या ‘सोनार’ नामक व्यक्तीच्या नावे सिमकार्ड असल्याचं उघड झालं. पण याबद्दल जळगाव पोलीस मात्र अनभिज्ञ आहे.  पुणे पोलिसांनी न्यायालयात माहिती सादर करताना याबद्दल खुलासा केला होता. मोबाईलमधील छेडछाड करून पुरावे नष्ट केल्याचाही संशय आहे.  आता ती सोनार नावाची व्यक्ती कोण आहे, हा प्रश्न कायम आहे.

advertisement

पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळून आले आहे. या सिमकार्डच्या वापरातून छेडछाड करून पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात महत्त्वाचा ठरत असलेला ‘सोनार’ नेमका कोण आहे? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसून माहिती मिळाल्यास ती देण्यात येईल, असे सांगितलं आहे.

advertisement

रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी जा अन् संध्याकाळी परत या, कल्याणमधील फेमस पिकनिक स्पॉट, तुम्ही पाहिले का?
सर्व पहा

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी या प्रकरणातील काही महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. प्रांजल खेवलकर यांना वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी काही कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला, असा पोलिसांनी दावा आहे. पण अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मोबाईलमधील व्हॅाटसॲप डाटा म्हणजे पुरावा नष्ट केल्याप्रकरणी रोहिणी खडसेंवर पुणे पोलीस काही कारवाई करतात का हे पाहण्याचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तो' सोनार नावाचा माणूस कोण? प्रांजल खेवलकर प्रकरणाला नवीन वळण, जळगाव पोलीसही शॉक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल