गंगापूर खुलताबाद मतदार संघामध्ये आमदार प्रशांत बंब यांनी एक गाव बैठक बोलावली होती. या बैठकीत गावकऱ्यांशी संवाद साधताना, एका सामान्य तरूणाने तुम्ही 15 वर्षात काय काम केलंत? असा सवाल केला. यावर प्रशांत बंब तरूणाला म्हणाले, मी नसलो तर तुला पश्चाताप होईल, इतकी वाईट परिस्थिती होईल. तुला पश्चाताप होईल,मरेपर्यंत पश्चाताप होईल,असे प्रशांत बंब यांनी सांगितले.
advertisement
तु आता दादागिरी करतोय़. याला न्या रे मागे असे प्रशांत बंब यांनी म्हणताच भाजप कार्यकर्त्यांनी उठून तरूणाला बैठकीतून हिसकावून लावले.तसेच त्याला कार्यकर्त्यांला मारहाण केल्याची घटना घडल्याची माहिती आहे.या घटनेचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हे मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असताना गवळीशिवरा येथे काही सामान्य नागरिकांनी त्यांना विकासाबद्दल प्रश्न विचारले आणि तुम्ही पंधरा वर्षात काय केले असे विचारले असताना त्यांनी त्या सामान्य नागरिकाला चांगलेच धारेवर धरले, सामान्य नागरिकांनी तरी देखील प्रश्न विचारले असता याला बाहेर घ्या म्हणत कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करत बाहेर काढले.
