TRENDING:

बारामतीत गाडी अडवली काकींची टार्गेटवर आला पुतण्या, अजित पवारांविरोधात वातावरण पेटलं

Last Updated:

प्रतिभा पवारांची गाडी अडवल्याता व्हिडीओ व्हायर झाल्यानंतर विरोधकांनी देखील टीका केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. बारामतीतच ज्या शरद पवारांनी टेक्सस्टाईल पार्क आणले त्याच ठिकाणी मिसेस पवारांना अडवल्याने संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांवर हल्लाबोल करण्यात येत आहे. विरोधकांनी देखील टीका केली आहे.
News18
News18
advertisement

महाविकास आघाडीने ट्वीट करत म्हटलय की, ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं त्यांचा रस्ता तुम्ही आज अडवलंय. आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली. शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये सोडले नाही. सुनेत्रा पवार या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत.

advertisement

advertisement

गाडी अडवण्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

टेक्सटाईल पार्कच्या गेटवर जवळपास अर्धा तास थांबवण्यात आले. अर्ध्या तासाने सुरक्षारक्षकाने गेट उघडले. प्रतिभा पवार आणि रेवती सुळे अर्धा तास गेटवर थांबल्या होत्या, गेटवर अडवण्याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. तर दुसरीकडे टेक्सटाईल पार्कच्या सीईओने हा दावा फेटाळला आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये रॅली काढण्यात येणार आहे. म्हणून मी सुरक्षारक्षकाला सांगितले की आतमध्ये रॅली वगैरे काढण्यास कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे तुम्ही गेट बंद करा. मात्र आम्ही त्यांची गाडी अडवली नाही, असे स्पष्टीकरण टेक्सटाईल पार्कचे संचालक अनिल वाघ यांनी दिले आहे.

advertisement

पार्कच्या गेटवर काय घडले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाकाकी नात रेवती सुळेंसह शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना पाहून गाडी अडवण्यात आली.आम्हाला पाहून तुम्ही गेट बंद केलं का? तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने सुरू आहेत मग मुख्य गेट बंद का केले? आम्ही चोरी करण्यासाठी थोडी आलो आहे. आम्ही बॅग घेण्यासाठी आलो आहेत. आम्हाला शॉपिंग करायची आहे. तुम्ही असे नाही वागू शकत. त्यावर सुरक्षा रक्षक म्हणाले, वरून परमिशन काढा.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीत गाडी अडवली काकींची टार्गेटवर आला पुतण्या, अजित पवारांविरोधात वातावरण पेटलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल