अशात आता गोपाल बदणेचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात बदणे हा अंगावर वर्दी न घालता रस्त्यावर काही गाड्या अडवताना दिसत आहे. याबाबत एका तरुणाने त्याला जाब विचारल्यानंतर त्याने नरमाईची भूमिका घेत घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
व्हिडीओत नक्की काय आहे?
advertisement
पोलीस वर्दीवर नसलेला हा बदणे रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची चौकशी करत असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार सुरू असताना एका वाहन चालकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचं चित्रीकरण केलं. तसेच अंगावर वर्दी नसताना तू गाड्या कशा काय तपासत आहे? माझी गाडी का अडवली? असा जाब समोरील तरुण विचारताना दिसत आहे. तरुणाच्या सजगतेमुळे गोपाल बदणे घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यावेळी संबंधित तरुण बदणेला विविध जाब विचारत आहे. "तुला कुठे पण गाड्या अडवायचा अधिकार कुणी दिला रे... तू पोलीस आहेस ना? याचं उत्तर दे... माझ्या नादी लागू नको... माझी गाडी आधी चेक कर... माझ्या गाडीत नक्की काय आहे, ते तू दाखव आधी... तू कुणाला फोन नको कुणाला करू, तू मला का अडवलं, याचं उत्तर दे..." अशा शब्दात तरुण बदणेला जाब विचारताना दिसत आहे. यावेळी मी तुझ्या नादी लागत नाही, असं म्हणत बदणे घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.
बदणे सध्या फलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असून तो पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे या व्हिडिओनं पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे आणि तो अधिकृत चौकशीसाठी वापरला जाणार का? याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. तूर्तास या व्हिडीओमुळे बदणेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
