वाल्मिक कराड याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहाराच्या संशयातून पुण्याचे भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांचीही सीआयडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. माजी नगरसेवक दत्ता खाडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते. वाल्मिकने त्याची दुसरी पत्नी मंगल जाधवच्या नावावर पुण्यात जमीन खरेदी केली. या जमिनीच्या व्यवहारामध्ये खाडे यांनी मध्यस्थी केली, असा सीआयडीला संशय आहे.
advertisement
मालमत्ता खरेदी करताना मध्यस्थीचा संशय
प्रसारमाध्यमांशी बोलताना दत्ता खाडे म्हणाले, मला अधिकाऱ्यांनी काल बोलावून घेतले. काही प्रश्न विचारले. एफसी रोडवरील गाळ्याच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. गाळ्याचे पैसे कमी करण्यासाठी मी कुणाला फोन केला होता का? मी स्वत: गेलो होतो का? अशी माहिती माझ्यापेक्षा पोलिसांना बिल्डर अधिक माहिती देऊ शकेल. खरंच या प्रकरणात मला कसलीही माहिती नाही आणि माझा लांब लांब पर्यंत संबंध नाही.
वाल्मिक कधीही माझ्या संपर्कात नव्हता
वाल्मिक कराड आणि त्यांचे कुणीही नातेवाईक माझ्या संपर्कात नाहीत. त्यांचा आणि माझा अजिबात संबंध नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना मी उत्तरे दिली. त्यांचे समाधान झाल्यावर त्यांनी मला जायला सांगितले. ज्यावेळी माझी चौकशीसाठी गरज भासेल त्यावेळी मी आपल्याला सहकार्य करेल, असे पोलिसांनी सांगितल्याचे खाडे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जायचो तेव्हा....
ज्या भागात वाल्मिकने त्याच्या पत्नीसाठी प्रॉपर्टी घेतली, त्या भागात मी नगरसेवक असल्याने त्यात माझाही सहभाग असेल, असे पोलिसांना संशय होता. परंतु माझी आणि वाल्मिकची केवळ तोंडओळख होती. यापलिकडे आमचे आणि त्यांचे कुठलेही संबंध नाहीत. गोपीनाथ मुंडे हयात असताना ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जायचो, त्यावेळी वाल्मिकही तिथे असायचा. त्यावेळी केवळ तोंडओळख असल्याने आम्ही कधीतरी बोललो असेल.
इतर आरोपींना ओळखता काय?
वाल्मिकसोबच्या इतर आरोपींसोबत माझी ओळख आहे का? असे पोलिसांनी विचारले. त्यावर मी त्यांना माझे वय ७० असल्याचे सांगत आरोपी पोरांचं वय २५-३० वर्षे आहेत. तुम्ही त्यांनाच विचारा, राम खाडेला तुम्ही ओळखता काय... असे उत्तर दिल्याचे खाडे म्हणाले.
