TRENDING:

Pune News : पांढरी स्विफ्ट अन् खोटी नंबर प्लेट, पुण्यातील कारमध्ये भरला होता 'माल', पाहून पोलीसही हादरले!

Last Updated:

खोटी नंबर प्लेट घेऊन येणाऱ्या एका पांढऱ्या स्विफ्टची पुणे पोलिसांनी तपासणी केली. कारमधील सामान पाहिल्यानंतर पुणे पोलिसांना धक्का बसला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : खोटी नंबर प्लेट घेऊन येणाऱ्या एका पांढऱ्या स्विफ्टची पुणे पोलिसांनी तपासणी केली. कारमधील सामान पाहिल्यानंतर पुणे पोलिसांना धक्का बसला, कारण त्या कारमध्ये तब्बल 99.93 लाख रुपयांचा अवैध माल होता. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 99.93 लाख रुपयांचा 95 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. गस्त घालत असताना पोलिसांना गांजाची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.
पांढरी स्विफ्ट अन् खोटी नंबर प्लेट, पुण्यातील कारमध्ये भरला होता 'माल', पाहून पोलीसही हादरले!
पांढरी स्विफ्ट अन् खोटी नंबर प्लेट, पुण्यातील कारमध्ये भरला होता 'माल', पाहून पोलीसही हादरले!
advertisement

एका कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची टिप पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी केसानंद-वाडेबोलहाई रस्त्यावरील बोलहाईमाता मंदिराच्या जवळ सापळा रचला. पोलिसांनी बनावट नंबर प्लेट लावलेली पांढरी स्विफ्ट डिझायर कार अडवली आणि त्यांना वाहनात लपवलेली गांजाची 95 पाकिटं सापडली. कारसह जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत जवळपास 99 लाख रुपयांच्या घरात आहे.

चौघांना अटक

advertisement

पोलिसांनी पकडलेल्या चारही आरोपींची नावं मिवा कालिदार वाघमारे (वय 36), विष्णू भागवत वाघमारे (वय 25), हरी श्रीपती दाबळे (वय 32) आणि मनोज अनिल सुरवासे (वय 29) अशी आहेत. हे सगळे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता हा गांजा पुण्यात विक्रीसाठी आणला होता, असं आरोपींनी सांगितलं. आरोपींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील धारावी चाळीतील त्यांच्या घरातून आणखी 18 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेला एकूण 95 किलो गांजा आणि वाहन यांचं एकूण मूल्य 99.93 लाख रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

याप्रकरणी लोहेगाव पोलीस स्टेशनमध्ये नार्कोटिक अँड ड्रग्स सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News : पांढरी स्विफ्ट अन् खोटी नंबर प्लेट, पुण्यातील कारमध्ये भरला होता 'माल', पाहून पोलीसही हादरले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल