१६५ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत भाजपनं तब्बल १२० जागा जिंकल्या आहेत. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतरच पुण्यात कोणत्या पक्षाचा महापौर होणार हे निश्चित झालं होतं. पण आता अखेर आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
पुणे महापालिकेत भाजपची शतकी खेळी
पुणे महानगरपालिकेत भाजपने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. एकूण १६५ जागांपैकी भाजपने स्वबळावर १२० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या 'पुणे व्हिजन'ला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला २७ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेस १५ जागांपर्यंत पोहोचू शकली. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) यांसारख्या पक्षांचे अस्तित्व या निकालात अत्यंत नगण्य राहिले.
advertisement
पुण्यात महापौर पदासाठी कोण दावेदार?
आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून तब्बल ११ नावांची चर्चा सुरू होती. यात सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता. महापौरपदाच्या रेसमध्ये असणाऱ्यांमध्ये गणेश बीडकर, श्रीनाथ धमाले, किरण दगडे पाटील, रंजना टिळेकर, रोहिणी चिमटे, राजेंद्र शिळीमकर, मंजुषा नागपुरे, धीरज घाटे, वीणा घोष, प्राची आल्हाट, मृणाल कांबळे यांचा समावेश होता. पण आता इथं दिग्गज पुरुष नेत्यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे.
