तासगाव–कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील सध्या राजकीय वर्तुळात सक्रिय असून त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत असतात. पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने आमदार रोहित पाटील यांना, “आपण लग्न कधी करणार?” असा थेट प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रश्नावर रोहित पाटील यांनी कोणतीही नाराजी न दाखवता स्मित हास्य करत उत्तर दिले. “आधी लगीन कोंढाण्याचं… म्हणजे अप्रत्यक्ष जिल्हा परिषद निवडणूक पहिली,” असे मिश्किल उत्तर दिले.
advertisement
जिल्हा परिषदेवर लक्ष
रोहित पाटील यांच्या या उत्तरामुळे पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या नेते, कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला रोहित पाटील यांनी आपल्या उत्तरातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. रोहित पाटील यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे.
रोहित पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा
सध्या राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, अनेक राजकीय नेते रणनिती आखण्यात गुंतले आहेत. स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी आपल्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख शैलीने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत रोहित पाटीलही संयमी, मोकळ्या स्वभावाचे आणि जमिनीवरचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात . पत्रकारांच्या प्रश्नाला दिलेले हे मिश्किल उत्तरही त्याच व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ठरले.
