TRENDING:

शिर्डीतील एकाच इमारतीतील ७ हजार जणांचे पत्ते, राहुल गांधी यांचा संसदेत गंभीर आरोप

Last Updated:

Rahul Gandhi parliament Speech : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सहभाग नोंदवला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ७० लाख नवीन मतदार वाढले, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना केला. या वाढलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्याची मागणीही राहुल गांधींनी केली. तसेच हे आरोप करताना शिर्डीतील एकाच इमारतीतील ७ हजार जणांचे पत्ते असल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी
राहुल गांधी
advertisement

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सहभाग नोंदवला. यावेळी लोकसभेला महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले यश मिळते मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होतो, याकडे प्रकर्षाने लक्ष वेधत महाराष्ट्र निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढी नव्या मतदारांची नोंदणी केली गेली, असा मुद्दा राहुल गांधी यांनी मांडला.

शिर्डीच्या एका इमारतीत ७ हजार नवमतदार वाढले, सगळ्यांचे पत्ते एकाच इमारतीतील कसे?

advertisement

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके ५ वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या ५ महिन्यात जोडले गेले. शिर्डीच्या एका इमारतीत ७ हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसते. शिर्डीतील 7 हजार मतदारांचे पत्ते एकाच इमारतीतले असल्याचा मोठा दावा राहुल गांधींनी केला तसेच महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये गडबड झाल्याचे राहुल गांधी म्हणाले.

advertisement

राहुल गांधी यांच्या आरोपावर भाजपकडून पलटवार

राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधी अजून बेशुद्धावस्थेत आहेत. राहुल गांधी यांनी पराभवाचे आत्मचिंतन करायला हवे असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी दिलाय. सगळ्या व्यवस्था बोगस आहेत, हा भ्रम लोकांमध्ये पसरवायचा, हा शहरी नक्षलवाद असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिर्डीतील एकाच इमारतीतील ७ हजार जणांचे पत्ते, राहुल गांधी यांचा संसदेत गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल