हिरा मावशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई औकीरकर या रागयडाच्या पायथ्याशी राहात. किल्ले रायगडावर पूर्वी रोप वेची व्यवस्था नव्हती. तेव्हा शिवभक्त उन्हातान्हात रायगडावर पायीच जायचे. त्यात अगदी पर्यटक, इतिहास अभ्यासक, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार, दुर्ग अभ्यासक हे देखील असायचे. किल्ल्यावर जाताच दमून भागून आलेल्या प्रत्येकाला हिरा मावशी ‘ताक घेता का?’ असं आपुलकीनं विचारात. त्यांच्या हातचे थंडगार ताक पिऊनच शिवभक्त पुढे जात असत.
advertisement
वडील स्मशानभूमीत कामाला, राहायला घर नाही; पोरानं नाव काढलं, भारतासाठी गोल्ड आणलं!
हिरा मावशी या नेहमी बालेकिल्ला ते चित्त दरवाजा याच्या मध्यभागी ताकासोबतच कोकम सरबत, लिंबू सरबत याच्या विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना मदत करत होते. रायगडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांशी हिरा मावशीचे जिव्हाळ्याचे नाते होते. पर्यटक विश्रांतीसाठी जिथं थांबायचे त्या ठिकाणाला ‘हिराचा वाडा’ म्हणूनच ओळखलं जायचं. त्यामुळे हिरा मावशीच्या निधनाने हळहळ व्यक्त होतेय.