या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अवघ्या दोन मिनिटांत आपलं बोलणं संपवलं. त्यांनी युती झाल्याची अधिकृत घोषणाही केली. मात्र या संवादादरम्यान त्यांनी एक गोष्ट मात्र लपवली. जागा वाटपावर आपण आज काहीच बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलं. जे काही आम्हाला बोलायचं आहे, ते पुढे जाहीर सभांमधून बोलू असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
advertisement
राज ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले, "सर्वाचं मन:पूर्वक स्वागत करतो. युतीबद्दल बाकी जे काही बोलायचं आहे. ते आम्ही जाहीर सभांमधून बोलू. काही दिवसांपूर्वी माझी एक मुलाखत झाली होती. त्यात मी म्हटलं होतं. कुठल्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्याच वाक्यापासून आमची एकत्र येण्याची सुरुवात झाली."
राज ठाकरेंनी कोणती बाब लपवली?
"आता कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे मी सांगणार नाही. तुम्हाला माहीत आहे, सध्या महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आणखी दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. कधी आणि कुठे उमेदवारी भरायची त्यांना सांगितलं जाईल. आज एकच गोष्ट सांगू इच्छितो, ज्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्या शिवसेना-मनसे युती झाल्याच आज आम्ही जाहीर करत आहोत. धन्यवाद..." असं राज ठाकरे म्हणाले.
