नेमकं काय म्हणाले कदम?
आदित्य ठाकरे यांच्या दापोली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मी काडीची किंमत देत नाही, आदित्य ठाकरेंचं योगदान काय ? तो आयत्या बिळात नागोबा. शिवसेना आम्ही मोठी केली. हिंमत असेल तर उध्दव आणि आदित्य ठाकरे यांनी इकडे येऊन निवडणूक लढवून दाखवावी, कोकणी जनता गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरे बेईमान आहेत, माझ्याकडून पर्यावरण खाते शिकले आणि मलाच बाजुला केलं,' असा घणाघात कदम यांनी केला आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'काका -काका म्हणून हाक मारत आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ही बाळासाहेबांची शिकवण नाही. आमचं घराणं राजकरणतून बाद करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगेशला पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. पण दापोलीमधली जनता माझ्यासोबत राहिली' असा आरोपही यावेळी कदम यांनी केला आहे.
