खरं तर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती. या भेटीनंतर दानवे आणि खोतकर यांनी फोटोसेशन केले होते. हे फोटोसेशन सूरू असताना एक कार्यकर्ता आडवा आला होता. या कार्यकर्त्याला दुर करण्यासाठी दानवे यांनी लाथेने बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून आता विरोधकांनी दानवे आणि भाजपवर टीका करायला सूरूवात केली आहे.
advertisement
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका सभेत दानवेंचा हा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता त्यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय.असे व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटतं की,भाजपने तयार केलेले हे लोक अशा पद्धतीने वागतात. 20 तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडिओ लक्षात ठेवा,असे आवाहन अंधारे यांनी मतदारांना केले आहे.
व्हायरल व्हिडिओवर कार्यकर्ता काय म्हणाला?
रावसाहेब दानवे यांनी ज्या कार्यकर्त्याला लाथ मारली होती, त्या कार्यकर्त्यांचे नाव शेख अहेमद असं आहे.शेख अहेमद हे रावसाहेब दानवे यांचे जूने मित्र आहेत. दरम्यान व्हायरल व्हिडिओच्या घटनेवर शेख अहेमद म्हणाले की, मी दानवेंचा तीस वर्षापासून मित्र आहे. खोतकर दानवेंना भेटायला आले होते. यावेळी फोटोसेशन करताना दानवेंचं शर्ट अडकलं होतं.. ते काढण्यासाठी मी पुढे गेलो होतो.पण दानवेंच्या हातात गुलदस्ता होता. पण सोशल मीडियावर जसं म्हणतायत त्यांनी लाथ मारली, तसं काही एक घडलं नाही आहे, असे स्पष्टीकरण शेख अहेमद यांनी दिले आहे.
