TRENDING:

Creta ला मागून धडक दिली, पण भलत्याच गाडीने महिलेचा जीव घेतला, चेंदामेंदा झाला, अपघात पाहून पोलीसह चक्रावले

Last Updated:

दुचाकी आणि कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे आज बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात 75 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. पार्वती तानू तरळ (रा. शिवणे बुद्रुक) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकी आणि कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.
News18
News18
advertisement

पुण्याच्या पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार हे आपल्या क्रेटा गाडीने पुण्याहून कुणकेशश्वर येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या गाडीत लहान मुले व इतर कुटुंबीय असे प्रवासी होते. रायपाटण टक्केवाडी येथे त्यांची गाडी आली असता, पाचल गुरववाडी येथील दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीने कारला मागून धडक दिली. या अनपेक्षित धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या पार्वती तरळ या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या.

advertisement

राजापूर पोलीस घटना स्थळी दाखल

नेमके याच वेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक (एमएच 08, एक्यू 7266) तेथून जात होता. रस्त्यावर पडलेल्या पार्वती या दुर्दैवाने या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या. चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक संतोष सिद्धार्थ सावंत हा रत्नागिरीहून मालवाहतूक करत होता.या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

advertisement

गेल्या आठवड्यात  दिली होती जोरदार धडक 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि कांद्याच्या दरात मोठी उलथापालथ, मक्याला बुधवारी किती मिळाला दर?
सर्व पहा

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरात गेल्या आठवड्यात  भीषण अपघाताची घटना घडली. पुण्यावरून श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या थार (चारचाकी) वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. परवेज हमदुले असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना श्रीवर्धन बाजारपेठेतील राऊत हायस्कूल परिसरात घडली.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या थार वाहनाने अचानक नियंत्रण गमावल्याने रस्त्याच्या कडेला चाललेल्य दोन मोटारसायकलींना धडक दिली. या अपघातात परवेज हमदुले याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर थार वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परवेज हमदुले यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पर्यटकांच्या निष्काळजी वाहनचालना विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची संख्या वाढत असताना वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि भरधाव वाहनांमुळे स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Creta ला मागून धडक दिली, पण भलत्याच गाडीने महिलेचा जीव घेतला, चेंदामेंदा झाला, अपघात पाहून पोलीसह चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल