कोकणात दिवसाढवळ्या अशा पद्धतीने खुलेआम फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकीवरील दोघांनी कार समोर आडवी लावून आधी दगडफेक केली. त्यानंतर शिवीगाळ करत एका तरुणाने रिवॉल्वर काढून हवेत गोळी झाडली. हा सगळा प्रकार काही सेकंदात घडल्याने कारमधील व्यक्ती घाबरून गेले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
पोलीस घटनास्थळी दाखल
advertisement
घटनेनंतर खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. फायरिंग केलेल्या रिवॉल्वरची पुंगळी (गोळीचा झाडलेला भाग) घटनास्थळी शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाचे चक्र फिरवण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेने कोकणात गुन्हेगारीचे सावट पसरू लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
