खरं तर सुजित घाणेकर हा तरूण सोमवारी मुंबईला जाणार होता. मात्र आत्येचा मुलगा आयूष चिनकटे आल्याने दोघांनीही नदीवर पोहायला जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार गावातील एका मित्रासह आयुष आणि सुजित दापोली तालुक्यातील सडवे येथील कोडजाईनदीवर पोहायला गेले होते.सुरूवातीला तिघांनी मासे पकडले होते. मासे पकडल्यानंतर दोघा आत्ये भावांना पोहायचा मोह आवरला नाही आणि दोघेही नदीपात्रात उतरले होते.
advertisement
या दरम्यान अचानक हे दोघे भाऊ नदीत बुडू लागले होते.हे दृष्य पाहून त्यांच्यासोबत असलेल्या एका तरूणाने आरडाओरड करण्यास सुरूवात केली होती. त्याची ही आरडाओरड पाहून घटनास्थळी अनेक ग्रामस्थांनी धाव घेत या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले नाही.त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोन आत्ये भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला. आज या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान आयुष हा मुलगा अतिशय हुशार होता. त्याला शिक्षण घेऊन खूप मोठे व्हायचे होते. पण या घटनेने त्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. या दुदैवी घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
