पण या प्रकरणानंतर रवींद्र धंगेकर मात्र राजकीय कोंडीत सापडल्याचं चित्र आहे. भाजपकडून त्यांची कोंडी केली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. आता महानगर पालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र अजूनही महायुतीचं जागावाटप झालं नाही. याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर आता मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
रवींद्र धंगेकर हे पुण्यात वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. ते आपला मुलगा प्रणव धंगेकर यांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडून पुण्यात शिंदे गटाची कोंडी केली जात आहे. निवडून येण्याची शक्यता नसलेल्या जागा शिंदे गटाला दिल्या जात आहेत, असा आरोप धंगेकरांचा आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं समजलं जात आहे. रवींद्र धंगेकर हे पुण्यातील शिवसेना शिंदे गटाचा प्रमुख चेहरा आहेत. अशात त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यास हा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जाऊ शकतो.
जागावाटपावरून धंगेकर नाराज
"निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला जाणीवपूर्वक देत आहे," असा थेट आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या राजकीय कुरघोडीमुळे धंगेकर आता पक्षीय चौकटीबाहेर जाऊन नवी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. जर प्रणव धंगेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्याचा फटका महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांची ही वेगळी भूमिका पुण्यातील राजकारणात काय वळण घेते? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.
