TRENDING:

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा,128 कोटींची मदत जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सरकारकडून 128 कोटी ६५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केला असून शेतकऱ्यांनर निसर्गाने क्रूर घाला घातला अलकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सरकारकडून 128 कोटी ६५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.
News18
News18
advertisement

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाची आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कांदा, मका, गहू, ज्वारीसह, पपई, केळी, बागांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला असून गारपिटीने सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी आणि मका पिकाचे अतोनात नुकसान केलं आहे.

advertisement

1 लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांना मदत 

राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या 1 लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान अवकाळीमुळे एकूण 1,45, 606 हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले आहे. तर जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान 2,33, 890 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला तर एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पावसानेही 1,94, 329 शेतकऱ्यांच्या 1,22, 993 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

advertisement

हाती आलेले पिकही वाया गेले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुठे तरी सुरुवात करावी लागते! रस्त्यावर उभं राहून प्रोडक्ट विकले, आता वर्षाला 20 कोटींचा बिझनेस! Video
सर्व पहा

गारपीटीसह मुसळधार पाऊस व वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पिकही वाया गेले आहे. शेतीतील तोट्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक संकटाने आणखी भर टाकली आहे. निसर्गाच्या तांडवामुळे शेतकऱ्यांची शेती, जनावरे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यां समोरील या भीषण संकटात त्यांना तत्काळ आर्थिक मदक करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा,128 कोटींची मदत जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल