TRENDING:

बदलापूर पुन्हा हादरलं! रिक्षाचालकाकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, मैत्रिणीने डोळ्यात माती फेकली अन्...

Last Updated:

बदलापूर पूर्व परिसरात एका १० वर्षांच्या चिमुकलीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी बाललैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. संबंधित प्रकरणातील आरोपीचं पोलिसांनी एन्काऊंटर देखील केलं होतं. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेनं बदलापूर शहर हादरलं आहे. बदलापूर पूर्व परिसरात एका १० वर्षांच्या चिमुकलीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
News18
News18
advertisement

नक्की घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या १० वर्षांची एक मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत ट्युशनला जात होती. दरम्यान, एका रिक्षाचालकाने मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने विरोध करूनही तो नराधम तिचा हात सोडायला तयार नव्हता. अशा अत्यंत भीतीदायक प्रसंगात पीडित मुलीच्या मैत्रिणीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मैत्रिणीने तातडीने रस्त्यावरील माती उचलून रिक्षाचालकाच्या डोळ्यात फेकली. माती डोळ्यात गेल्याने रिक्षाचालकाची पकड ढिली झाली आणि दोन्ही मुलींनी तिथून पळ काढत स्वतःचा जीव वाचवला.

advertisement

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला बेड्या

घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाची ओळख पटवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अंबरनाथ येथून शोधून काढले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांची कारवाई आणि भूमिका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या प्रकरणाबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी सांगितले की, "६ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बदलापूर पुन्हा हादरलं! रिक्षाचालकाकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, मैत्रिणीने डोळ्यात माती फेकली अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल