तासगाव आणि खानापूर आटपाडी या शेजारी शेजारी असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आर आर पाटील आणि अनिल बाबर हे दोघेही आज दुर्दैवाने हयात नाहीत. आर आर पाटील यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र रोहित पाटील तर अनिल बाबर यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र सुहास बाबर हे चालवत आहेत.
स्व. आर. आर. पाटील आबा आणि स्व. अनिलभाऊ बाबर यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर. आर. पाटील तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून त्यांनी प्रथमच विधानसभेत पाऊल ठेवले होते. आज पण त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील व आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केला.
advertisement
या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आर आर पाटील आणि अनिल बाबर यांची जोडी पुन्हा एकप्रकारे एकत्र आल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवलीय. रोहित पाटील हे तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेत.
महत्त्वाचे-
दिवंगत नेते आर आर पाटील आणि दिवंगत नेते अनिल बाबर यांच्या प्रमाणे रोहित पाटील-सुहास बाबर प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत गेले होते.
१९९० साली आर आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून विधानसभेत केला होता प्रवेश