TRENDING:

Rupali Chakankar: संताप, राग अन् खरात! राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया, सगळे पाहतच राहिले

Last Updated:

या देवस्थानशी माझ्या कुटुंबीयाचा संबंध होता, पण खरात आणि त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल काही माहिती नव्हतं पोलिसांनी या प्रकरणी खोलवर तपास करावा, याची मागणी मी पोलिसांकडे केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे वादात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेरीस आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. तसंच, आपल्याविरोधात खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या, खोटी माहिती दिली गेली आहे, त्यांच्यावर कायदेशीर नोटीसा पाठवल्या जातील, अशी भूमिका चाकणकर यांनी मांडली.
News18
News18
advertisement

अशोक खरात प्रकरणी मुंबईत घडामोडींना वेग आला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर  महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर  जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या  पदाचा राजीनामा सुपूर्द केला. देवगिरी बंगल्यावरून बाहेर आल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

"शिवलिका संस्थानमध्ये मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून तिथे काम केलं. समाजातील अनेक प्रतिष्ठीत  व्यक्ती आणि अनेक मान्यवर व्यक्ती त्या ट्रस्टवर होते. या ट्रस्टवर होते त्यानंतर आयोगाची अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट २०२५ रोजी या ट्रस्टचा कार्यकाळ संपला होता.  सामाजिक आयुष्य जगत असताना कुणाला कुणाला तरी गुरू मानत असतो. खरात यांना आम्ही गुरू माणलं, त्या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम असेल, महाशिवारात्रीचा कार्यक्रम असेल, त्यावेळी आम्ही उपस्थितीत राहत होतो. गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने ती पाद्यपुजा केली होती. ५ ते ६ वर्ष संपर्कात होतो, एखाद्याचं कृत्य काय, ते कसे वागतात याची सुतराम कल्पना नव्हता. मला ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला' अशी प्रतिक्रिया चाकणकरांनी दिली.

advertisement

'जे काही घडलं ते अत्यंत गलिच्छ आहे, घाणेरेड कृत्य' 

"या देवस्थानशी माझ्या कुटुंबीयाचा संबंध होता, पण खरात आणि त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल काही माहिती नव्हतं पोलिसांनी या प्रकरणी खोलवर तपास करावा, याची मागणी मी पोलिसांकडे केली होती. पोलीस महासंचालकांना भेटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे मागणी केली. माझं कुटुंब हे वारकरी होतं, आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिका दृष्टीकोनातून होती. म्हणून आम्ही या कुटुंबाशी जोडलो होतो. वर्षभरातून आम्ही कार्यक्रमाला हजर राहत होते. जे काही घडलं ते अत्यंत गलिच्छ आहे, घाणेरेड कृत्य आहे, पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, पोलिसांनी कारवाई करावी, असं चाकणकर यांनी सांगितलं.

advertisement

खबरदार पुढारीच्या बातमीवर खुलासा

"मला दोन गोष्टी प्रकर्षाने सांगायचं आहे, काल एक पत्रकार खबरदार पुढारी यांनी त्यांच्या वृतपत्रात  एक बातमी दिली होती, १९ ३ २०२५ रोजी बातमी दिली होती. आमच्या समुपदेशाकडे ती बातमी आली. समुपदेशाने त्यांनाा ८ तारखेला पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला होता, आपल्याकडे काही माहिती असेल तर द्यावी. दुसरं पत्र होतं पोलीस अधिक्षकांना दिलं होतं, जी काही माहिती असेल तर ती द्यावी, काही कारवाई करावी. माझ्या कार्यालयातून पत्रकाराला फोन गेला होता, काही पुरावे आहे का पोलिसांकडे जाऊन तक्रार कराावी, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी सांगितलं कोणतीही माहिती नाही. कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे आयोगाकडे पत्र पाठवलं, आमच्याकडे कोणतीही माहिती नाही' असा खुलासाही चाकणकर यांनी केला.

advertisement

b

दोन दिवसांपासून चुकीची माहिती, बातमी पसरवली जात आहे, ती चुकीची आहे त्याबद्दल निषेध व्यक्त करते. ५ मार्च रोजी मला एक मेल आला, या संबंधित मेल मध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची तक्रार होती. आमचं पत्र त्याच दिवशी पोलिसांना पत्र पाठवलं होतं. आम्ही पोलिसांना पत्र पाठवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी माझ्या आयोग कार्यालयामध्ये १७ तारखेला लागली होती. या सुनावणीमध्ये पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं कारवाई करत होते. कुणालाही मागे घातलं नाही, तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं. पण त्यांच्याकडे नाव करणाऱ्या तरुणाचं नाव होतं, कारवाईचे आदेश दिले होते. तेजस्वी सातपुते यांचं पत्र होतं १७ मार्च रोजी एका महिलेची तक्रार होती. कार्याालयात काम करणाऱ्या एका तरुणाची ही तक्रार होती, असा खुलासाही त्यांनी केला.

advertisement

'सुषमा अंधारे, ठोंबरेंना नोटीस पाठवणार'

"अशा प्रकार दोन दिवसांपासून चुकीच्या बातम्या चालू आहे. एखादी व्यक्ती कशी पुढे जाऊन वागते, ते कुणाला माहिती नव्हतं. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, खरात देवस्थानशी आम्ही जोडलो होतो. आमचे तिथे फोटो तिथे होते. देवस्थानमध्ये होते. तिथे आमचे फोटो होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी होते. आमच्यासोबत अनेक लोकांचे फोटो तिथे होते पण दोन दिवसांपासून आम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते चुकीचं आहे.  काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन चुकीचे आरोप केले. तसंच पसरवलं गेलं. हा फोटो आहे १२ सप्टेंबर रोजीचा आहे. एक तारीख खोडली आणि अमावश्या दाखवली, ते फोटो २ सप्टेंबरचे फोटो होते. माझ्या हाताला कुठेही जखम नव्हता. हा ४ सप्टेंबरचा फोटो आहे. कुठेही माझ्या हाताला जखम नाही. कायद्यााच्या चौकटीतून नोटीस पाठवू, अश्लिल टीका करणे, खोट्या बातम्या पसरवणे, यांच्याबद्दल नोटीस पाठवणार आहे, असा इशाराही चाकणकारांनी दिला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

परत एकदा सांगते, ती व्यक्ती दोषी आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. एखादी व्यक्ती पुढे जाऊन ४ ते ५ वर्षांने कशी असेल हे माहीत नसतं. या प्रकरणाच्या सखोल निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे म्हणून मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचा काय निर्णय आहे त्या सुनेत्रा पवार घेतील. सविस्तर पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेईन, असंही चाकणकरांनी ठणकावून सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rupali Chakankar: संताप, राग अन् खरात! राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया, सगळे पाहतच राहिले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल