पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त यांना पत्रव्यवहारात करत महिला आयोगाने काही सूचना केल्या होत्या. खेवलकर प्रकरणात पत्रही पाठवले होते. पोलिसांच्या चौकशीचा अहवाल महिला आयोगाला गुरूवारी प्राप्त झाला आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर, पोपटानी यांच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेतले होते. अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी खेवलकर यांच्या घरातून मोबाईल जप्त केला होता. याच मोबाईलमध्ये अनेक मुलींसोबकचे आक्षेपार्ह चॅट आणि फोटो व्हिडीओ पोलिसांना मिळाल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. पुण्यात चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement
खेवलकरांच्या फोनमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ अश्लील फोटो
खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमधून महिलांचे नग्न अर्धनग्न फोटो हाती लागले आहेत. मोबाईल फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ फोटो आहेत. यात मुलींचे नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करून, नशा देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे दिसते. या व्हिडीओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्यात आले. मोलकरणीचे देखील वाईट फोटो मोबाईलमध्ये आहेत. केवळ मुंबई, पुणे, ठाणे येथूनच नाही तर परराज्यातील मुलींना बोलवून अत्याचार केले गेले, असे तपासात समोर आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
खेवलकर याच्या मोबाईलमध्ये सात मुलींचे नंबर आयुष नावाने सेव्ह
खेवलकर याच्या मोबाईलमध्ये सात मुलींचे नंबर आयुष नावाने सेव्ह करण्यात आले होते. आरूष नावाचा माणूस खेवलकर याला मुली सप्लाय करत होता. सिनेमात काम देतो, असे प्रथम तो सांगत असे. वैश्या व्यवसायासाठी बळजबरीने वापर करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असेही चाकणकर म्हणाल्या.
३५० पेक्षा जास्त मुलींचा वापर
या प्रकरणात ३५० पेक्षा जास्त मुलींचा वापर केला आहे असे अहवालातून समोर आले आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच मोबाईलमध्ये मिळालेल्या नग्र फोटो आणि व्हिडीओत अनेक वेळा प्रांजल खेवलकर दिसून येत आहेत, असेही चाकणकर यांनी सांगितले.
