TRENDING:

वेग जीवावर बेतला, दुचाकीवरचे तिघेही जागीच गेले, बाईक एसटीच्या समोरील भागात अडकली

Last Updated:

Nashik Satana Bike ST Accident: सटाण्याजवळ साक्री-शिर्डी मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बब्बू शेख, प्रतिनिधी, सटाणा : साक्री-शिर्डी मार्गावर सटाण्याजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करून घटनेचा पंचनामा केला.
नाशिक अपघात
नाशिक अपघात
advertisement

सटाण्याजवळ साक्री-शिर्डी मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बस नंदुरबार येथून वसईकडे जात असताना हा अपघात झाला असून प्राथमिक माहितीनुसार दुचाकी अति वेगात होती. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन आदळली.

advertisement

अपघात इतका भीषण होता की दुचाकी एसटीच्या समोरील भागात जाऊन अडकली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वेग जीवावर बेतला, दुचाकीवरचे तिघेही जागीच गेले, बाईक एसटीच्या समोरील भागात अडकली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल