प्रेमसंबंध आणि आंतरजातीय विरोधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. प्रकरणी आंचल मामीलवारचे वडील गजानन मामीलवार, भाऊ हिमेश मामीडवार, लहान भाऊ साहिल मामीडवार आणि यांच्यासह जयश्री मामीडवार -ठाकूर या महिलेला अटक करण्यात आली होती.
कोठडी संपल्यामुळे आज आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. चार आरोपीच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसाची वाढ करण्यात आली. समक्ष ताटे याचा 27 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. आंतरजातीय प्रेम संबंधातून त्याची प्रेयसी आंचल हिच्या वडिलांनी आणि दोन भावांनी अन्य दोन आरोपींच्या मदतीने खून केला होता. 28 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते, तेव्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
advertisement
अल्पवयीन आरोपींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर एक तारखेला पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा आंचलची आई जयश्री मामीडवार हिला न्यायालयीन कोठडी तर गजानन मामीडवार , साहिल मामिडवार सह अन्य दोघांना तीन दिवसाची कोठडी सुनावणयात आली होती. आज पुन्हा या आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण आठ पैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी अजूनही फरार आहे. या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
