नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून खून करण्यात आलेल्या सक्षम ताटे प्रकरणात अटक असलेल्या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्याात आली आहे. नव्याने अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी त्याच रात्री सक्षम ताटे याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसह, दोन भावाना अटक केली होती. आतापर्यंत या खून प्रकरणात एकूण आठ आरोपी अटक करण्यात आली. आरोपींना वेळोवेळी पोलिसांनी न्यायालयात हजर केलं.
advertisement
आंचलच्या वडिलाला न्यायालयीन कोठडी
आज चार आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात आंचलचे वडील गजानन मामीडवार, मोठा भाऊ साहिल मामीडवार, सोमेश लाखे , वेदांत कुदळेकर या चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या चार जणांसह आंचलची आई आणि अल्पवयीन भाऊ या दोघांना देखील 28 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आंचलची आई जयश्री मामीडवार हिला तीन दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आंचलच्या अल्पवयीन भावाला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. उर्वरित चार आरोपींना वेळोवेळी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. 28 तारखेला तीन दिवसाची, 1 डिसेंबरला पुन्हा तीन दिवसांची कोठडी आणि 4 डिसेंबरला दोन दिवसांनी कोठडी सुनावली होती.
चार आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी
आज चार आरोपांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नव्याने अटक करण्यात आलेल्या अमन शिरसे याला आणि आदित्य सोमनकर या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सक्षम ताटे खून प्रकरणात एकूण अटक आरोपी
1- गजानन मामीडवार - आंचलचे वडील
2 - जयश्री मामीडवार - आंचलची आई
3 - साहिल मामीडवार - आंचलचा मोठा भाऊ
4 - आंचलंचा अल्पवयीन भाऊ ( ज्याने गोळ्या झाडल्या)
5 - सोमेश लखे - साहिलचा मित्र
6 - वेदांत कुदळेकर - साहिलचा मित्र
यांना न्यायालयीन कोठडी तर अल्पवयीन भावाला सुधारगृहात रवानगी
आता दोन जणांना अटक
- 1 अमन सिरसे
- 2 आदित्य सोनमनकर
- घराची रेकी करणारे दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
