TRENDING:

सांगलीत मोठी घडामोड, संभाजी भिडेंचे धारकरी निवडणुकीच्या रिंगणात; नेमकं काय ठरलं?

Last Updated:

सांगलीत भाजपसह विविध पक्षांनी तयारी सुरू केली असतानाच आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : सांगली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. भाजपसह विविध पक्षांनी तयारी सुरू केली असतानाच आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजपकडे धारकरी कार्यकर्त्यांसाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपकडून केवळ एकाच जागेची ऑफर देण्यात आल्याने शिवप्रतिष्ठानमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
News18
News18
advertisement

हिंदुत्ववादी विचारसरणीवर काम करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी लव जिहाद, गोरक्षा, धर्मसंवर्धन यांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक मुद्द्यांवर सातत्याने सक्रिय असतात. सांगली शहरातही अनेक वर्षांपासून धारकरी कार्यकर्ते संघटनात्मक पातळीवर काम करत असतानाही महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार करण्यात आला नसल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे.

धारकरी राहुल बोळाज काय म्हणाले?

advertisement

या पार्श्वभूमीवर आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी राहुल बोळाज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना राहुल बोळाज यांनी भाजपवर थेट नाराजी व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरून काम करत असताना भाजपने आमचा विचार केला नाही, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजपने ज्या उमेदवारांना तिकीट दिले आहे, ते अनेक प्रभागांमध्ये जनतेच्या परिचयाचे नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

advertisement

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा का निर्णय घेतला?

पक्षाने आमच्या कार्याची दखल घेतली नाही, तरीसुद्धा हिंदुत्वाचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी आम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे राहुल बोळाज यांनी स्पष्ट केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे कोणत्याही राजकीय सौदेबाजीपेक्षा विचारधारेला प्राधान्य देतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सांगलीत भाजपला नवे आव्हान

advertisement

दरम्यान, शिवप्रतिष्ठानच्या या भूमिकेमुळे सांगली महापालिका निवडणुकीत भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अपक्ष म्हणून लढणाऱ्या धारकरी उमेदवारांना कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, या घडामोडींमुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या घडामोडीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सांगलीकडे लागले आहे.

हे ही वाचा :

advertisement

शरद पवारांची साथ सोडल्यानंतर राखी जाधव पहिल्यांदा बोलल्या, म्हणाल्या 'नेता दुर्लक्षित करतो तेव्हा...',

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं ठिकाण, 40 दिवस चालते यात्रा, हंडी मटण खाण्यासाठी असते गर्दी
सर्व पहा

आदित्य ठाकरेंना वरळीत मोठा धक्का, 17 वर्षे सोबत असलेला शिलेदार अखेर बोलला, म्हणाला मला अंधारात...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीत मोठी घडामोड, संभाजी भिडेंचे धारकरी निवडणुकीच्या रिंगणात; नेमकं काय ठरलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल