TRENDING:

भाजपचे 3 आमदार असून फेल, ठाकरे गट आणि अजितदादांच्या NCP ने उधळला गुलाल

Last Updated:

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना गंगापूरमधून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूरमध्ये बाजी मारली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर :  नेहमी या ना त्या विधान आणि प्रकरणामुळे नेहमी चर्चेत असणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना नगर परिषद निवडणुकीमध्ये चांगलाच धक्का बसला आहे. बंब यांच्या होमग्राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गंगापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर खुलताबादमध्येही प्रशांत बंब यांना धक्का बसला आहे. तिथे काँग्रेसने बाजी मारली आहे.

advertisement

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ५२ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. मराठवाड्यात ५२ नगराध्यक्ष आणि १,२४६ सदस्यांची निवड होत आहे. अशातच गंगापूरमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे.

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना गंगापूरमधून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूरमध्ये बाजी मारली आहे. खुलताबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे आमीर पटेल विजयी झाले असून, गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे संजय जाधव यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे.

advertisement

तर दुसरीकडे,  फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप आमदार अनुराधाताई चव्हाण आणि मंत्री अतुल सावे यांना धक्का बसला आहे. या ठिखामी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्तापर्यंत विजयी झालेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार खालील प्रमाणे

1) फुलंब्री - ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे विजयी झाले आहे.

2) गंगापूर -

advertisement

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जाधव विजयी झाले आहे.

3) खुलताबाद - येथे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमीर पटेल.

4)वैजापूर नगरपरिषदेमधून भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी विजयी

कोणत्या नेत्याला धक्का

वैजापूर मध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का

वैजापूर नगरपरिषदेमधून भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी विजयी

स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांना झटका

advertisement

आमदार प्रशांत बंब यांना गंगापूर मधून मोठा धक्का, आमदार सतीश चव्हाण यांनी मारली बाजी

फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का, आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना धक्का, ठाकरे गटाचे उमेदवार विजयी

खुलताबादमध्ये ही काँग्रेसने खाते उघडले त्यामुळे स्थानिक आमदार प्रशांत बंब यांना धक्का, मुख्यमंत्र्यांची खुलताबादमध्ये झाली होती सभा

छत्रपती संभाजीनगर एकूण 7 नगर अध्यक्ष

भाजप : 1

शिवसेना : 2

राष्ट्रवादी अप : 1

उद्धव शिवसेना : 1

काँग्रेस : 2

राष्ट्रवादी शप : 0

------------------------------------------------------------

गंगापूर : राष्ट्रवादी अप - संजय जाधव विजयी

खुलताबाद : काँग्रेसचे अमिर पटेल विजयी

फुलंब्री ( पंचायत ) : ठाकरे गट राजेंद्र ठोंबरे 1797 मतांनी विजयी

वैजापूर : भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी 6 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी

आघाडीवर

सिल्लोड : शिवसेनाचे समीर सत्तार आघाडीवर

कन्नड : काँग्रेस शेख फरीन आघाडीवर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिना, पाहण्यासाठी तुफान गर्दी, Video
सर्व पहा

पैठण : शिवसेनेच्या विद्या कावसानकर आघाडीवर

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचे 3 आमदार असून फेल, ठाकरे गट आणि अजितदादांच्या NCP ने उधळला गुलाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल