आवश्यक आहे.
धामणगाव ते चांदूर रेल्वे समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवस तासाभरासाठी समृद्धी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत धामणगाव आणि ते चांदूर रेल्वे दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम २७ ते २९ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत पाच टप्प्यात करण्यात येणार आहे .
advertisement
वाहतूक 45 ते 60 मिनिटांकरता पूर्णतः बंद राहणार
दरम्याव या कामासाठी नगरगांवडी, टिटवा या गावातील वाहतूक बंद राहणार आहे. या प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांकरता पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.
| गाव | बाजू | दिनांक | वेळ |
| नगरगावंडी | मुंबई वाहिनी | 27 डिसेंबर | दु. 2 ते दु. 3 किंवा दु. 3 ते दु. 4 |
| नगरगावंडी | मुंबई वाहिनी | 27 डिसेंबर | दु. 2 ते दु. 3 किंवा दु. 3 ते दु. 4 |
| नगरगावंडी | नागपूर वाहिनी | 28 डिसेंबर | दु. 2 ते दु. 3 किंवा दु. 3 ते दु. 4 |
| टिटवा | नागपूर वाहिनी | 29 डिसेंबर | स. 11 ते दु. 12 किंवा दु. 12 ते दु. 1 |
| टिटवा | मुंबई वाहिनी | 29 डिसेंबर | स. 11 ते दु. 12 किंवा दु.12 ते दु. 1 |
समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावरून दरमहा 10 लाखांहून अधिक वाहने प्रवास करतात. दरम्यान, मुंबईशी जोडणी मिळाल्यानंतर वाहतुकीत वाढ झाली आहे. तसेच मुंबई आणि नागपूरमधील प्रवासाचा वेळ कमी झाल्याने शेतमालाची वाहतूक वाढली आहे. नाताळाच्या सुट्टीत फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
हे ही वाचा :
